मेष : वडिलांचा विरोध जाणवेल. न्यायिपणाने वागाल. शासकीय कामात अधिक लक्ष द्यावे लागेल. वैचारिक कर्मठपणा दर्शवाल. नवीन विचारांची कास धरावी.
वृषभ : जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. वारसाहक्काची कामे पुढे सरकतील. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : काही गोष्टी दिरंगाईने होतील. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात. आधुनिक बाजू जाणून घ्यावी. शांतपणे विचार करावा.
कर्क : गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कष्टाला पर्याय नाही. काही गोष्टी दिरंगाईने होतील. वात-विकार बळावू शकतात. आपली संगत तपासून पहावी.
सिंह : बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल. चिकाटीने कामे कराल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. राजकारणी लोकांना फायदा होईल. ज्ञानात भर पडेल.
कन्या : घरातील ज्येष्ठांशी जुळवून घ्यावे. दिवस घरकामात निघून जाईल. भावंडांची बाजू विचारात घ्या. मुलांचे प्रश्न सामोरे येतील. मानसिक स्वास्थ्य जपावे.
तुळ : चिंतनातूनच योग्य मार्ग काढावा. सर्व बाजूंचा सखोल विचार कराल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्व-कर्तृत्वावर भर द्याल. चट्कन निराश होऊ नका.
वृश्चिक : स्थावरच्या कामांना गती येईल. चिकाटीने कामं कराल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. कमीत-कमी शब्दांत मत मांडा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा.
धनू : पायाचा त्रास जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आवाक्याबाहेरील खर्च टाळावा. मनातील चिंता बाजूला सारावी. ध्यानधारणा करावी.
मकर : चांगला व्यावसायिक लाभ होईल. काही कलागुण दिसायला वेळ द्यावा. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. स्थावरची कामे मार्गी लागतील. फार चिंता करत बसू नका.
कुंभ : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. चारचौघात मिळून मिसळून वागाल. महिला आपली हौस पूर्ण करतील. नवीन गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.
मीन : कामात एकसूत्रता ठेवावी. फार चंचलपणे वागू नका. गप्पा मारण्यात वेळ घालवाल. आपल्यापेक्षा वयाने लहान लोकांशी मैत्री कराल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील.