कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये महाराष्ट्राला हादरून सोडणारी एक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. राज्यात कुठेही महिला सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झालं आहे. कोल्हापुरातील रायगड कॉलनीत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
एका गर्भवती महिलेवर पाच वेळा बलात्कार करण्यात आला आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे बलात्कार करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून बाकीच्या संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
ही पीडित महिला आसामची आहे. तिला गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचंही सांगण्यात येत आहे. मर्जीविरुद्ध पीडितेशी संबंध ठेवल्याप्रकरणी आता पोलिसांता गुन्हा दाखल करण्यात आला असून करवीर पोलीस पुढील तपास करत आहेत.
१)कोल्हापूरात गर्भवती महिलेवर सामुहीक बलात्कार
२)औरंगाबाद मध्ये ही सामुहीक बलात्काराची घटना
३)वाशिम मध्ये ही चालत्या खाजगी बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कारआजच्या एका दिवसातल्या या ३ घटना
मुख्यमंत्री महोदय काय चाललयं आपल्या महाराष्ट्रात
ही शिवशाही नाही ही तर मोगलाई फोफावलीये
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 11, 2021