चोपडा प्रतिनिधी । चोपड्यात तिघांकडून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना १० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुंदरगढी ता. चोपडा येथील विजय सुरेश शिरसाठ (वय-४२) हे खासगी वाहन चालक असून चालवून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. विजय शिरसाठ हे गल्लीतील नेहमी लहान मुलांना घाबरवित असतात. दरम्यान १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते गल्लीत आले असता लहान मुलाला घाबरवले असता संशयित आरोपी किशोर रामु सारवान, रामु मन्न सारवान आणि प्रकाश रामु सारवान सर्व रा. सुंदरगढी ता. चोपडा यांना राग आल्याने किशोर सारवान याने लोखंडी रॉड हातात घेवून विजय शिरसाठ यांच्या डोक्यावर, पोटावर, पाठीवर व हातावर बेदम मारहाण केली. तर इतर दोघांना लाकडी दांडुके हातात घेवून बेदम मारहाण केली. यात विजय शिरसाठ हा जखमी झाला.
याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पारधी करीत आहे.