जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोल्हे नगरमध्ये राहणाऱ्या विवाहितेने विजेचा धक्का बसल्याने विवाहितेच्या पाच वर्षाच्या मुलीने प्रसंगावधानाने आई व बहिणीचे प्राण वाचविल्याची घटना ५ रोजी रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
एमआयडीसीतील कंपनीत अधिकारी असलेले प्रसाद काळे हे कोल्हे नगरात पत्नी गुलबक्षी (वय-३३), मुलगी शिवांगी (वय-३) आणि इशान्वी (वय-२) यांच्यासह वास्तव्याला आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ते ड्यूटीवर गेल्यावर घरी पत्नी दोन्ही मुली असे तिघंच होते. दोघं मुलींची आंघोळ घालण्यासाठी गुलबाक्षी यांनी स्टीलच्या बादलीत हिटर टाकून पाणी गरम केले. मात्र मुलींनी आंघोळ करण्यास नकार देऊन नंतर करू असे सांगून बाहेर खेळण्यासाठी गेल्या. दोन्ही मुली बाहेर खेळण्यासाठी गेल्याने केव्हाही घरात येऊ शकतात धोका नको म्हणून त्यांनी बटन बंद करून पाणी थंड केले. त्यानंतर गुलबाक्षी यांनी स्वत : च्या आंघोळीसाठी पाणी गरम केले. परंतू पाणी घेतांना हिटरचे बटन बंद न करता बादलीत हात टाकला असता त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुली घरात आल्या.
आईचा चेहरापाहून आई मस्करी करीत असल्याचे लहान मुलीला जाणवले व ती हसतच आईजवळ धाव घेतली. परंतू मोठी मुलगी शिवांगी हिने प्रसंगावधान ओळखून तातडीने बहिणीला आईपासून लांब केले व प्लॅस्टीक स्टूलवर उभे राहून बटन बंद करून बादलीतील वीजप्रवाह बंद केला. थोडा उशीर झाल असता तर कदाचित आई गुलबाक्षी व बहिण इशान्वी यांच्या बाबतीत दुर्घटना घडली असती.


