जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात अमृत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटारीमुळे खड्डे झाले आहे. दररोज लहान मोठे अपघात होत आहे. याचाच फटका नगरसेविकेला बसला असून त्यांची दुचाकी घसरून त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.
शहरात सर्वत्र खड्डे पडून रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. यातच मेहरूणच्या नगरसेविका जयश्री सुनील महाजन या रामेश्वर कॉलनी परिसरात दुचाकीने जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना त्यांचा वाहनावरील ताबा सुटून त्या खाली पडल्या. त्यात त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
त्यांचे पती सुनील महाजन व परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांचा उजवा हात कोपराजवळ फ्रॅक्चर झाल्याचे एक्स-रे त निष्पन्न झाल्याने प्लास्टर लावण्यात आले आहे.