जळगाव प्रतिनिधी । भंडारा जिल्हा रूग्णालयातील आगीत बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.
९ जानेवारी रोजी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयात नवजात शिशू विभागात शॉर्टसर्किमुळे लागलेल्या आगीत नुकतेच जन्मलेले बालक ते महिन्याभरापासून रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
प्रशासनाच्या धिम्म कारभारामुळे हा प्रकार झाला आहे. मृत झालेल्या बालकांना न्याय मिळावा यासाठी संबंधित व दोषींवर तत्काळ कारवाई करून आरोपींना शिक्षा द्यावी आणि बालकांच्या परिवाराला आर्थिक मदत जाहीर करावी अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. या निवेदनावर निकीता महाजन, तेजस रडे, सनमुख महाजन, सुरज खटुआ, आर्यन भांडारकर, यश कनडारे, शुभम पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.