जळगाव – कृषि विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मध्येच तात्काळ मिळावी. याकरिता व्हॉटसअप ॲटोरिप्लाय (Autoreply) ची सुविधा सुरु करण्यात आलेली आहे.
मोबाईलवर कृषी विभागाच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी 8010550870 या व्हॉटसअप क्रमांकावर नमस्कार किंवा हॅलो (Hello) हा शब्द टाईप करुन पाठवल्यास आपणास स्वागत संदेश प्राप्त होतो. त्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द दिलेले आहेत.
उदाहरणार्थ Well, Mech, Hort इत्यादी शब्द टाईप करुन वरील क्रमांकावर पाठवल्यास आपणास पाहिजे असणाऱ्या योजनेची माहिती उपलब्ध होईल. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.