जळगाव – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास तर्फे सुरू असलेल्या निधी संकलन अभियानाअंतर्गत श्रीराम मंदिर कलाकृती निर्माण व दीपोत्सव उपक्रम ला ना शाळेच्या मैदानावर दि. १० रविवार रोजी घेण्यात आला.
श्री ड्रॉईंग क्लासेस चे श्री सचिन मुसळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ तासात, ११००० दिवे व ११ किलो रांगोळी वापरून ५०० बाल रामभक्तांनी श्रीराम मंदिर व प्रभू श्रीरामाचे चित्र तयार करून त्यावर पणत्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला. या प्रसंगी Architect श्री संदीप सिकची सर प्रमुख अतिथी म्हणून सहपरिवार उपस्थित होते.
तसेच श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान जळगाव जिल्हा प्रमुख – देवेंद्र भावसार, रा स्व संघ जळगाव शहर कार्यवाह श्री राजेशजी ज्ञाने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची महाआरती करून उपक्रमाचा समारोप करण्यात आला. उपक्रमाला मोठ्या संख्येने जळगाव शहरातील रामभक्त उपस्थित होते.