पुणे – मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, घेवडा आणि परराज्यातील मटारच्या भावात घट झाली आहे. तर, पावसामुळे कांदा-बटाट्याची आवक घटली आहे. त्यामुळे नवीन कांद्याचे भाव वाढले आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी मार्केटयार्डात 100 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून 9 ते 10 ट्रक गाजर, गुजरात आणि कर्नाटक येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, मध्य प्रदेश येथून मटार 15 ते 16 ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून 5 ते 6 ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरातून मिळून बटाट्याची 30 ट्रक इतकी आवक झाली आहे.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 1100 ते 1200 गोणी, कोबी सुमारे 5 ते 6 टेम्पो, प्लॉवर 8 ते 10 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 10 ते 12 हजार पेटी, भुईमूग शेंगा 70 ते 80 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, कांदा 100 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवा 270-350, जुना: 220-300, बटाटा : 150-220, लसूण : 500-1000, आले : सातारी 100-200, भेंडी : 200-300, गवार : 300-350, टोमॅटो : 200-250, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 300-500, दुधी भोपळा: 80-100, चवळी: 150- 200, काकडी : 80-120, कारली हिरवी 200-220, पांढरी 150-160, पापडी : 250-300, पडवळ : 200-220, प्लॉवर : 40-60, कोबी : 40-60, वांगी : 200-250, डिंगरी : 150-200, नवलकोल : 50-60, ढोबळी मिरची : 200-250, तोंडली : कळी 200-250, जाड 100-120, शेवगा : 500-700, गाजर 150-200, वालवर 300-350, बीट : 40-60, घेवडा : 200-250, कोहळा : 100-120, आर्वी : 200- 250, घोसावळे : 160-180, ढेमसे : 200-220, भुईमूग शेंग : 400-500, मटार : स्थानिक : 300, परराज्य 150-200, पावटा : 250-300, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, नारळ : शेकडा 1000-1600, मका कणीस : 60-120.