मेष : स्थावरची कामे मार्गी लागतील. हातून एखादे सत्कार्य घडेल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. चांगली मन:शांती लाभेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल.
वृषभ : प्रवासात सर्वतोपरी काळजी घ्यावी. काहीशी कौटुंबिक चिंता सतावेल. काटकसरीने वागावे लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतभिन्नता दर्शवू नका.
मिथुन : मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. बाहेरील अन्नपदार्थ टाळा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
कर्क : नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. मनातील अकारण भीती बाजूला सारावी. नामस्मरणाचा लाभ घ्यावा. कौटुंबिक खर्च वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. हातातील कामे तडीस जातील. कुटुंबात मंगल कार्य होईल. ओळखीचा फायदा घ्यावा.
कन्या : अतिअपेक्षा बाळगू नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे. समाधान बाळगणे गरजेचे आहे. मानसिक शांतता जपावी. जोडीदाराची बाजू लक्षात घ्या.
तुळ : प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. नातेवाईकांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक चिंता लवकरच मिटेल. हातातील कामांत कसूर करू नका. अनाठायी खर्च टाळावा.
वृश्चिक : हातात नवीन अधिकार येतील. भान राखून वागावे. वरिष्ठांची मर्जी राहील. धाडसाने कामे हाती घ्यावी. कामे अधिक उर्जेने कराल.
धनू : कौटुंबिक काळजी करू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा. अतिविचारात वेळ व्यर्थ जाईल. सामुदायिक वादापासून दूर राहावे. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.
मकर : गरज लक्षात घेऊन खर्च करा. मैत्रीत गैरसमज टाळावेत. स्थावरच्या कामांतून फायदा संभवतो. अचानक धन लाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल.
कुंभ : बढतीसाठी प्रयत्न करावेत. कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. झोपेची तक्रार जाणवेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. फसवणुकीपासून सावध रहा.
मीन : अपवादाकडे लक्ष देऊ नका. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रित करा. हितशत्रूंपासून सावध रहा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. कौटुंबीक शांतता जपावी.