मुंबई, वृत्तसंस्था । ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४११ रुग्ण रविवारी सापडले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ४७c
ठाणे शहरात १३४ रुग्ण आढळले आहेत. यासह शहरात ५६ हजार ६५३ रुग्णांची नोंद झाले. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३२८ झाली. कल्याण – डोंबिवलीत १२९ रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू आहे. या शहरात आता ५८ हजार ५०९ बाधीत असून एक हजार ११८ मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये १० रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात ११ हजार ४४९ बाधीत नोंदले असून मृत्यू संख्या ३६३ झाली आहे. भिवंडी परिसरात आठ रुग्ण व मृत्यू नाही. येथे आता सहा हजार ६४१ बाधितांची तर, ३५२ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदर शहरात २७ रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. या शहरात २५ हजार ७९५ बाधितांसह ७९० मृतांची संख्या आहे.
अंबरनाथ शहरात १२ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार १०२ बाधितांसह मृतांची संख्या ३०६ आहे. बदलापूरला १२ रुग्ण आज सापडले असून नऊ हजार ३८ बाधीत आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या ११९ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये आठ रुग्णांचा शोध लागला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत आतापर्यंत १८ हजार ८८७ बाधीत झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५८२ मृत्यूची नोंद कायम आहे.