Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

by Divya Jalgaon Team
January 10, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिक – उत्तर प्रदेशात घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणाच्या पुनरावृत्तीनंतर नाशिकमधील धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवित तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. एकीकडे राज्य सरकारकडून महिला अत्यचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शक्‍ती कायदा आणण्याचे प्रयत्न सुरू असताना या प्रकारामुळे संताप व्यक्‍त केला जात आहे.

धक्कादायक बाब पीडितेवर आठवडाभरापूर्वी सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून विधीसंघर्षित बालकासह सात जणांना अटक केली. या संशयितांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

या संदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे आई-वडील मजुरी करतात. ते कामावर गेले असताना ही घटना घडली. सायंकाळी ते परतल्यानंतर 13 वर्षाची मुलगी घरात दिसली नाही. पालकांनी तिची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी पीडिता भयभीत अवस्थेत आढळून आली.

आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रात्रीच संशयित दीपक खरात (19, सिन्नर फाटा), रवि कुऱ्हाडे (19, पांडवलेणी), आकाश गायकवाड (24, रेल्वे मालधक्का), सुनील कोळे (24, जेलरोड) यांना तर, पहाटे सोमनाथ खरात (19, मालधक्का रोड, नाशिकरोड) आणि पूजा वाघ (27) यांच्यासह एका विधीसंघर्षित मुलाला अटक केली.

संशयितांनी आठ दिवसांपूर्वी देखील पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना नाशिक न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली.

Share post
Tags: crimeMarathi NewsNashikनाशिक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Previous Post

धक्कादायक : ठाण्यात कोरोनाचे ४११ रुग्ण सापडले; आठ जणांचा मृत्यू

Next Post

सावधान : देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा कहर

Next Post
सावधान : देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा कहर

सावधान : देशातील ६ राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा कहर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group