Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बांभोरी पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात

by Divya Jalgaon Team
January 10, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बांभोरी पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात

जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथील राष्ट्रीय महामार्गावर जकातनाक्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात बांभोरी येथील आयशर ट्रक महामार्गालगत ८० ते ९० फूट खोल कोसळल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचालक बालबाल बचावला आहे.

आज सकाळी झालेल्या अपघातात ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहेत. तब्बल पाच ते सहा तासानंतर बांभोरी तरुण तसेच नागरिकांच्या सहकार्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा आयशर ट्रक बाहेर काढण्यात आला. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार बांभोरी येथील सोपाळ कोळी यांच्या मालकीचा आयशर ट्रक (एमएच ०४ सीयू २२८८) रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामागाने जळगावहून पाळधीकडे जात होता. यादरम्यान बांभोरी जकातनाक्यापासून काही अंतरावर समोरुन येणार्‍या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात तसेच ब्रेक न लागल्याने चालक राजू माळी याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यानंतर हा ट्रक थेट ७० ते ८० फूट खोल असलेल्या दरीत कोसळला.

तीन ते चार वेळा पलटी मारत हा ट्रक एका ठिकाणी अडकला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह बांभोरी येथील तरुण तसेच नागरिकांनी धाव घेतली. ट्रकमधील चालक राजू माळी यास ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. यानंतर ट्रॅक्टर बोलावून ट्रॅक्टरच्या सहाय्याने तसेच बांभोरी तरुण, वाहनधारक यांच्या अथक परिश्रमाने तब्बल पाच तासानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास आयशरला बाहेर काढण्यात यशस्वी झाले.

Share post
Tags: AccidentcrimeJalgaonMarathi Newsबांभोरी पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात
Previous Post

शेंदुर्णी येथे बदनामी, धमकी देणाऱ्या युवकावर गुन्हा

Next Post

जळगावातील शनीपेठ परिसरातून महिलेची सोनसाखळी लंपास

Next Post
जळगावातील शनीपेठ परिसरातून महिलेची सोनसाखळी लंपास

जळगावातील शनीपेठ परिसरातून महिलेची सोनसाखळी लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group