शेंदूर्णी प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या लिहा येथील एका युवका विरोधात बदनामी व धमकी दिल्या प्रकरणी पहुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार अतुल उर्फ बबलू राजाराम चव्हाण (वय २५) याने फिर्यादीचे मुलीची बदनामी करून अशी धमकी दिली होती. बबलू चव्हाण विरोधात फिर्याद नोंदविण्यात आल्याने त्याच्यावर गु.र. नंबर १४/२०२१ भा.दं.वी.५००,५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना.किरण शिंपी शेंदूर्णी दुरक्षेत्र हे करत आहेत.