Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोऱ्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस मिळाले जीवदान

by Divya Jalgaon Team
January 10, 2021
in जळगाव
0
पाचोऱ्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस मिळाले जीवदान

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी या ॅस्पिटलच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून एका गंभीर जखमी महिलेस जिवनदान दिले आहे.यात डॉ. स्वप्निल पाटील यांचा मोलाचा वाटा असून रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

जामनेर तालुक्यातील सुनंदाबाई बाविस्कर यांचा गेल्या ८ दिवसांपूर्वी मोटरसायकल अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवुन मेंदुत रक्तश्राव झाल्याने त्या अत्यवस्थ होत्या. अशा परीस्थितीत त्यांना पाचोऱ्यातील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च करण्याचीही त्यांची परिस्थिती नसतांना डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांनी कुटुंबियांना धीर देत पुढील उपचार सुरू केले.

मेंदुत रक्तश्राव झाल्याने सुनंदाबाई बाविस्कर ह्या कोमात गेल्या होत्या. परंतु आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचा परिपुर्ण फायदा घेत डॉ. स्वप्निल पाटील यांनी सतत ७ दिवस स्वत: लक्ष देवुन उपचार करत महिलेस जिवनदान दिले. दि. ९ जानेवारी रोजी सुनंदाबाई बाविस्कर यांना हाॅस्पिटल मधुन डिस्चार्ज देण्यात आला.

याप्रसंगी रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी डॉ. स्वप्निल पाटील यांचे चरण स्पर्श करुन आभार मानले. यावेळी लहुजी संघर्ष सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव नाना भालेराव, जिल्हाध्यक्ष सुखदेव आव्हाड, उत्तर महाराष्ट्र संघटक प्रकाश कोतकर, जिल्हा सल्लागार राजेंद्र चव्हाण, समाजसेवक सुरज चांगरे, तालुका सचिव गोपाल अहिरे, समाजसेवक दिप जोंधळे (दोंडवाडे), जितेंद्र बाविस्कर (सोनाळ), ईश्र्वर बाविस्कर (सोनाळा), संभाजी बाविस्कर (सोनाळा), नंदु इंगळे (सोनाळा) यांनी डॉ. स्वप्निल पाटील यांचे आभार मानले. यावेळी सर्वच उपस्थितांना आनंद अश्रु अनावर झाले होते.

Share post
Tags: JalgaonMarathi Newspachoraपाचोऱ्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस मिळाले जीवदान
Previous Post

चोपड्यात गजानन महाराज चौगावकर यांचे कीर्तन

Next Post

महापौरांनी मोहाडी रस्त्यावरील एलईडीची केली पाहणी

Next Post
महापौरांनी मोहाडी रस्त्यावरील एलईडीची केली पाहणी

महापौरांनी मोहाडी रस्त्यावरील एलईडीची केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group