Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महापौरांनी मोहाडी रस्त्यावरील एलईडीची केली पाहणी

by Divya Jalgaon Team
January 10, 2021
in जळगाव
0
महापौरांनी मोहाडी रस्त्यावरील एलईडीची केली पाहणी

जळगाव, प्रतिनिधी । मागील आठवड्यात मोहाडी रस्त्यावर एलईडी बसविण्यात असून हे एलईडी सुरू आहेत की नाही याची पाहणी पहाटे ५ वाजताच महापौर सौ. भारती सोनवणे यांनी केली. यावेळी त्यांनी सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी देखील संवाद साधला.

शहरात सध्या एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. शहराला नवीन झळाळी मिळत असून वीज बचत देखील होणार आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मोहाडी रोड परिसरात फेरफटका मारत पाहणी केली. सर्व एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्यावर लख्ख प्रकाश पडला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

मोहाडी रोड परिसरात सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या महिलांशी देखील महापौर सौ.भारती सोनवणे यांनी संवाद साधला. एलईडी बसविल्याने मुख्य रस्ता उजळून निघाला आहे. उजेड वाढल्याने रस्त्यावर होणाऱ्या सोनसाखळी लंपासच्या प्रकाराला आळा बसणार असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होणारे गैरप्रकार देखील रोखले जाणार असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, परिसरात आणि शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी महापौरांकडे मांडली. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली. रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागाचा मक्ता दिलेला असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नागरिकांना दिली.

Share post
Tags: #Mohadi RoadJalgaonMahapaurमहापौरांनी मोहाडी रस्त्यावरील एलईडीची केली पाहणी
Previous Post

पाचोऱ्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेस मिळाले जीवदान

Next Post

जळगावात ब्राम्हण संघातर्फे कोरोना योध्यांचा सत्कार

Next Post
जळगावात ब्राम्हण संघातर्फे कोरोना योध्यांचा सत्कार

जळगावात ब्राम्हण संघातर्फे कोरोना योध्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group