जळगाव प्रतिनिधी । बोदवड तहसील हद्दीतील सातबारा उतारा तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर लावण्यासाठी दोन लाखांची लाच मागण्यात आली होती. लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने कारवाई केलेले बोदवडचे तहसीलदार हेमंत पाटील यांना निलंबीत करण्यात आले आहे.
बोदवड तहसील हद्दीतील सातबारा उतारा तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर लावण्यासाठी दोन लाखांची लाच मागण्यात आली होती. या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचून तहसीलदार पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी संजय झेंडू शेरनाथ व तलाठी निरज पाटील यांना १८ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. दरम्यान, हे प्रकरण घडल्यानंतर बोदवडचे तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांच्यावर महसूल विभागाने निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्या निलंबनाचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.