चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील वीर सावरकर चौकात ८ रोजी सकाळच्या सुमारास माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कटरने प्राणघातक हल्ला करणारे तिघे जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चाळीसगावात वीर सावरकर चौकात ८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांनी औरंगाबाद येथे जाऊन पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेतल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात जगदीश महाजन, मुलगा विशाल जगदीश महाजन आणि संजय घटी अशा तिघांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय सचिन कापडणे तपास करीत आहेत.