मेष : धार्मिक कामात हातभार लावाल. सेवेचे महत्व जाणून वागाल. परदेशगमनाचा योग येईल. आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांची गाठ पडेल. सामाजिक सेवेत काम कराल.
वृषभ : जोडीदाराशी मतभेद संभवतात. मानसिक स्थैर्य जपावे. जुन्या कामातून लाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामात लक्ष घालावे लागेल. रेस, जुगार यांपासुन दूर राहावे.
मिथुन : उत्कृष्ट वैवाहिक सौख्य लाभेल. उगाचच मतभिन्नता दाखवू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वातविकाराचा त्रास जाणवेल. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत.
कर्क : मानसिक शांतता जपावी. क्षुल्लक कटकटी नजरेआड कराव्यात. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कफ विकार जाणवतील. तुमची चिडचिड वाढू शकते.
सिंह : शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. अंत:स्फूर्तीने कामे कराल. सूचक स्वप्ने पडतील. जुगाराची आवड दाखवाल. काहीसे स्वछंदीपणे वागाल.
कन्या : उत्तम गृहसौख्य लाभेल. घरात थोर व्यक्तींची ऊठबस राहील. भावंडांची बाजू जाणून घ्या. चांगले वाहन सौख्य लाभेल. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.
तूळ : मानसिक चंचलता जाणवेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मानसिक संवेदना दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागणे ठेवाल. नवीन गोष्टी जाणून घ्याल.
वृश्चिक : कौटुंबिक कार्यक्रम आखले जातील. अडथळ्यातून मार्ग काढाल. मेहनतीला मागे हटू नका. कामात उतावीळपणा करू नका. हट्टीपणे वागणे राहील.
धनू : आपल्या मनाप्रमाणे वागाल. वैचारिक प्रौढता दाखवाल. सामाजिक जाणिवेतून कामे कराल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. गैरसमजुतीला बाजूला ठेवा.
मकर : कामात क्षुल्लक कारणाने दिरंगाई होईल. पारमार्थिक उन्नती साधता येईल. सामाजीक सेवेत हातभार लावाल. बौद्धिक दिमाख दाखवाल. कामात चलाखी दाखवाल.
कुंभ : सुसंस्कृत लोकांच्यात वावराल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. काटकसरीने वागाल. अधिकारी व्यक्तींच्या ओळखी होतील.
मीन : कामाची धांदल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. अधिकारी व्यक्तींची मदत मिळेल. प्रवासात सावधानता बाळगावी. तुमचा मान वाढेल