जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या पोलिसांनी महाविद्यालयातील सुशोभीकरणाच्या सौंदर्याची स्तुती केली. तसेच त्यांनी परिसराची पाहणी करून फोटो देखील काढले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुशोभीकरण झाले आहे. अप्रतिम भित्तिचित्रे रंगवण्यात आली आहेत. ती पाहण्याचा मोह पोलिसांना आवरला गेला नाही. त्यांनी परिसरातील निर्जंतुकीकरण मशीन, अधिष्ठाता कार्यालयाला आलेलं राजवाड्याचे स्वरूप, भिंतीवरील निसर्ग, वारली चित्रे यांसह अद्ययावत वाहन पार्किंग पाहून उत्सुकता जागृत करीत जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ओपीडी यंत्रणेबद्दल देखील त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्र. अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.