Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

तळोद्यात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

by Divya Jalgaon Team
January 9, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
तळोद्यात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

चोपडा, प्रतिनिधी । श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा शाखेच्या, वतीने राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा येथे खासदार हीना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री संत सावता माळी युवक संघातर्फे संविधान दिन, क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास २०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभा तळोदा येथे सावता भवनात ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या रकमेचा चेक, सन्मानपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष अरविंद मगरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक संजय बबनराव माळी, हेमालाल मगरे, महिला बाल कल्याण सभापती अंबिका राहुल शेंडे, प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन हे उपस्थित होते.

खासदार डॉ. हिना गावित यांनी स्वतःच्या जीवनातील अनेक पैलूंचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर केला तसेच मनुष्याने आपले शिक्षण अविरत चालू ठेवावे व स्वतः देखील एक खासदार असून सद्यस्थितीला आपण देखील अजून शिक्षण घेत आहोत ही बाब प्रकर्षाने नमूद केली. विजयी स्पर्धकांना संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी फोनद्वारे शुभेच्छा देऊन भविष्यातील वाटचालीसाठी युवक संघाच्या वतीने काही मदत लागल्यास युवक संघाचे सर्व पदाधिकारी तत्पर असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. याप्रसंगी संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी उपस्थितांना युवक संघाच्या सामाजिक कार्याची प्रचिती करून दिली.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु ५००१/- महात्मा फुले मंडळ कोपरगाव अध्यक्ष व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संजवनी संचालक प्रदीप नवले व कोपरगाव नगरपालिका नगरसेवक वैभव गिरमे यांच्याकडून, तर द्वितीय पारितोषिक रोख रु ३००१/- कै गिताबाई मांगो महाजन यांच्या स्मरनार्थ देविदास मांगो महाजन माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद धरणगांव जिल्हा जळगाव व ब्रिलियंट क्लासेस चोपडाचे संचालक प्रा. भरत महाजन यांच्याकडून तृतीय पारितोषिक रोख रु.२००१/- कै.द्रोपदाबाई व मोहन कृष्णाजी खैरनार यांच्या स्मरणार्थ श्री दीपक खैरनार जिल्हाध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा धुळे यांचे कडून देण्यात येत आहे.

या स्पर्धेमध्ये तळोदा येथील उर्वशी राजेंद्र कलापुरे (इ.१० वी ), हर्षाली उंबर सिंग वसावे (इ. ९ वी) , प्रज्ञावर्धन विजय देशमुख (इ.१० वी) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र युवक संघटनेच्यावतीने त्यांच्या व्हाट्सअप वर पाठवण्यात येणार आहे.

यशस्वीतेसाठी युवक संघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष दिपक खैरनार, जळगाव जिल्हा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र माळी, खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी सर, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपड्याचे कार्याध्यक्ष नरेंद्र एन. महाजन सर यांनी मानले.

Share post
Tags: ChopdaEducationMarathi Newsतळोद्यात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरणबक्षीस वितरण
Previous Post

यावल येथे एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीची ७८ हजारात फसवणूक

Next Post

छावा मराठा युवा महासंघाच्या तक्रारीची उपमहापौरांची दखल

Next Post
छावा मराठा युवा महासंघाच्या तक्रारीची उपमहापौरांची दखल

छावा मराठा युवा महासंघाच्या तक्रारीची उपमहापौरांची दखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group