जळगाव, प्रतिनिधी । छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ऑर्किड हॉस्पिटल समोरील मागील १ महिन्यापासून चालणाऱ्या ड्रेनेजच्या कामाबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची आज उपमहापौर सुनील खडके यांनी दखल घेत मक्तेदाराकडून तत्काळ काम पूर्ण करून घेतले.
ऑर्किड हॉस्पिटल समोर ड्रेनेजचे काम होऊन सुमारे १ महिना झालेला झाला असून येथील काम संथगतीने सुरु होते. याबाबत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे आवाज उठविला होता. याची तत्काळ दखल घेऊन उपमहापौर सुनील खडके यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी भेट देत माहिती जाणून घेतली. उपमहापौर खडके यांच्या सुचनेनुसार मक्तेदाराने तत्काळ त्याजागेवर मुरूम टाकून रस्ता व्यास्थित करून दिला. यानंतर पुष्पलता बेंडाळे चौकात व सागर हायस्कूल जवळ देखील अशीच समस्या असल्याने त्याठिकाणी देखील प्रत्यक्ष पाहणी करून अभियंता आर. टी. पाटील यांना त्याठिकाणी गळती बंद करण्याच्या सूचना दिल्या.
फक्त एका सोशल मिडियावर टाकलेल्या पोस्टचे गांभीर्य ओळखुन काम केल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी उपमहापौर सुनील खडके यांचे अभिनंदन केले व आभार मानले. यावेळी उपस्थित मक्तेदार हसमुख पटेल यांना योगेश देसले व अमोल कोल्हे यांनी फाईलावर घेत निकृष्ठ कामाबद्दल व त्यांच्या प्रतिनिधीकडून होणाऱ्या मुजोरीबद्दल सुनावले व यापुढे जनतेला त्रास दिल्याचे आढळून आल्यास ठेका रद्द करण्याची तक्रार करू असे सांगितले.
याप्रसंगी उपमहापौर सुनील खडके , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , सचिन धांडे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत मोरे , जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश जाधव, महानगर अध्यक्ष भैय्या पाटिल, महानगर सरचिटणीस राहुल नेवे, महानगर प्रसिद्धी प्रमुख किरण ठाकूर, जिल्हा सदस्य उज्वल पाटील, कृष्णा जमदाडे, प्रशांत चौधरी, रिहान सैय्यद आदि उपस्थित होते.