Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल येथे एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीची ७८ हजारात फसवणूक

by Divya Jalgaon Team
January 9, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
यावल येथे एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीची ७८ हजारात फसवणूक

यावल। येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीला ७८ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत यावल पोलीसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल येथील एसटी आगार मॅकेनिक म्हणुन कार्यरत असलेले संजय रामभाऊ मेहरकुरे (वय ४२ वर्ष मुळ राहणार शिरसी तालुका उमरेड जिल्हा नागपुर , ह . मु . गणपती नगर यावल) हे मागील सहा वर्षापासुन यावल एसटी आगारात मॅकेनिक या पदावर कार्यरत आहेत.

मंगळवार दि ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.२१ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी माधुरी यांना ७०२९४३५९१७या मोबाईल क्रमांकावरुन एका हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तिने आपल्या मोबाईलची फोन पे प्रोव्हायडर असल्याची बतावणी करीत फिर्यादी यांचे स्टेट बॅंक ऑफ इंडीया यावल शाखाचे खाते क्रमांक घेवुन आरोपीने वेगवेगळे खात्यांची लिंक टाकुन फोन पे ९८३४ असे हा क्रंमांक व २१६५० हा क्रंमाक दोन वेळा तर १०६५० हा क्रमांक दोन तर ४८४८ हा क्रंमाक एक वेळेस टाकुन प्रथम ९ हजार ८३४ रूपये, ९ हजार ८३४ रूपये , नंतर तिसऱ्या टप्यात २१ हजार ६५० पुन्हा २१ हजार ६५०नंतर १० हजार६५० व ४ हजार८४८ असे एकुण ७८ हजार४ ६६ रुपयांची रक्कम फोन पे प्रोव्हाडर करण्याच्या नांवाखाली रक्कम काढून घेतली.

या फसवणुकीबाबत संजय रामभाऊ मेहरकुरे यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून त्या अज्ञात व्यक्ति विरूद्ध भाग५ गु . र. न.४ / २०२१ माहीती तंत्रज्ञान कायदा २०००चे कलम ६६ भादवी कलम४२०अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय तायडे हे करीत आहे. दरम्यान, स्टेट बँक कर्मचारी किंवा अधिकारी म्हणुन अज्ञात व्यक्तीचा फोन येत असेल व तो तुमच्या फोन पे पासवर्ड व इतर आपल्या बँक खात्याशी माहीती विचारत असेल तर अशा फोनवरून कृपया माहीती देवु नये असे आवाहन सर्व ग्राहकांना स्टेट बँकेच्या सुत्रांकडुन देण्यात येत आहे.

Share post
Tags: crimeFraudJalgaonMarathi NewsYawalयावल येथे एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीची ७८ हजारात फसवणूक
Previous Post

चाळीसगावात उभारली सिंहगड किल्याची प्रतिकृती

Next Post

तळोद्यात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

Next Post
तळोद्यात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

तळोद्यात राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group