Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील रेल्वे रूळावर जखमी तरूणाला रूग्णालयात उपचारार्थ दाखल

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील रेल्वे रूळावर जखमी तरूणाला रूग्णालयात उपचारार्थ दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर परिसरातील ममुराबाद रस्त्यावर स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या रेल्वे रुळावर आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एक जखमी तरुण विव्हळत पडला होता. त्याला एका पत्रकाराने ट्रॅकमॅन आणि नागरिकांच्या मदतीने त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

जखमी तरूणाची अनोळखी असून त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले आहे. ममुराबाद रस्त्यावरील स्मशानभूमीशेजारी तरुण रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत असल्याचे शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता पत्रकार जकी अहमद यांना दिसले. तसेच तेथून नागरिक त्याला बघून जा-ये करीत होते. मात्र त्याला हात लावायला कोणी तयार नव्हते. तसेच 108 अम्ब्युलन्सला कॉल करून देखील 15 मिनिटं वाट पाहून अखेर त्याच वेळी परिसरातील ओळखीच्या नागरिकांना बोलावून व ट्रेकमेन समशेर अली, नवाज अली, अरबाज खान, शोएब अली यांच्या मदतीने रिक्षाचालक तुषार ठाकरे याच्या रिक्षेत जकी अहमद यांनी तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. याठिकाणी जनसंपर्क कक्षाची मदत घेत जकी अहमद, समशेर अली यांनी दाखल केले.

डॉ. दीपक जाधव, डॉ. उमेश जाधव आणि परिचारिका व कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याला ऑक्सिजन लावून उपचार सुरु केले. त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पायाला मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या तरुणाची संध्याकाळी उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती.

घटनेची माहिती मिळताच जीआरपीचे हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील महाले यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी पत्रकार जकी अहमद ट्रॅकमन समशेर अली यांचे अभिनंदन करून वेळेत तरुणाला उपचार मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पुढील कार्यवाही जीआरपी पोलीस करीत आहेत.

Share post
Tags: crimeJalgaonजळगावातील रेल्वे रूळावर जखमी तरूणाला रूग्णालयात उपचारार्थ दाखल
Previous Post

जळगावातील नवीन बसस्थानकातून मोबाइल लंपास, गुन्हा दाखल

Next Post

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group