Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील

अशी भूमिका शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडली

by Divya Jalgaon Team
January 8, 2021
in जळगाव
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जळगाव – औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ झाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. याप्रश्नी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील, अशी भूमिका शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडली. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात ड्राय रन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत एकाही शिवसैनिकाच्या मुखातून या शहराचा उल्लेख औरंगाबाद असा येत नाही. तो संभाजीनगर असाच येतो. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, ही पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ही काय शिवसेनेची आजची घोषणा नाही. संभाजीनगर नाव देणे काही चुकीचे नाही. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सांगितले आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेवरील टीकेचा समाचार घेतला. ‘हिंदुत्त्व कुणाचे बदलले आहे, हे कोणाच्या सांगण्यावरून ठरत नाही. शिवसेनेचा जन्म हा हिंदुत्त्वापासून झाला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये. शिवसेनेच्या स्थापनेनंतर विलेपार्लेमधून जे आमदार निवडून आले, त्यांची निवडणूक फक्त हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर रद्द झाली होती, हे फडणवीसांनी विसरू नये’, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

Share post
Tags: Gulabrao PatilJalgaonMarathi Newsमहाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील
Previous Post

जळगावातील रेल्वे रूळावर जखमी तरूणाला रूग्णालयात उपचारार्थ दाखल

Next Post

मध्यप्रदेशात मशिदीवर चढून नुकसान केल्याप्रकरणी मुस्लिम बांधवांकडून निषेध

Next Post
मध्यप्रदेशात मशिदीवर चढून नुकसान केल्याप्रकरणी मुस्लिम बांधवांकडून निषेध

मध्यप्रदेशात मशिदीवर चढून नुकसान केल्याप्रकरणी मुस्लिम बांधवांकडून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group