जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बस स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाश्याच्या खिश्यातून दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी रात्री ८.३० वाजता लांबविला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा येथील कासार गल्लीत जितेंद्र हुकूमचंद शर्मा (रा. पारोळा) हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत़ काही कामानिमित्त ते खंडवा येथे गेले होते. मंगळवार, ५ जानवोरीला ते जळगाव नवीन बसस्थानकावर पारोळा जाण्यासाठी पोहोचले़ रात्री ८़३० वाजेच्या सुमारास फलाटावर पारोळा बस लागली़ बसमध्ये चढत असताना गर्दी झाली. हीच संधी साधत चोरट्याने त्यांच्या खिशातील दहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला़ बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी खिशाला हात लावला असता, मोबाईल गायब झालेला दिसून आला. त्यांनी लागलीच इतर प्रवाशांना मोबाईलबाबत विचारणा केली.
मात्र, कुणालाही मोबाईल दिसून आला नाही़ अखेर तो चोरी झाल्याची खात्री झाली. शुक्रवारी जितेंद्र शर्मा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.