जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोराना अहवालात आज जिल्ह्यातून ५९ रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर ३९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील आठ तालुके निरंक असल्याचे समोर आले आहे.
जळगाव शहर-१६, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-६, अमळनेर-४, चोपडा-१५, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-१३, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ५९ रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आज आढळून आलेल्या कोरोना अहवालात एकुण ५६ हजार १८३ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ३५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४९३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चाळीसगाव तालुक्यातील १ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकुण १ हजार ३३४ रूग्ण बाधित आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.