जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात गुरांच्या बाजाराजवळील अनिकेत ट्रान्सपोर्टजवळ जुगाराच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री धाड टाकली. यात ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तीन जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजाराजवळील अनिकेत ट्रान्सपोर्टजवळ मोहित मेन्स पार्लरच्या भिंतीला लागून चार जण बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळ असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली त्यानुसार बुधवार ६ जानेवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला कारवाई करून संशयित आरोपी पंढरीनाथ भोजू हटकर (वय-४८) रा. म्हसावद ता.जि.जळगाव, राजू गजानन पाटील (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, रामभाऊ निना पाटील (वय-५३) रा. रामेश्वर कॉलनी या तिघांना ताब्यात घेतले.
तिघांची अंगझडती घेतली असता ६ हजार ४३० रूपये रोख आणि ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकुण ३७ हजार ४३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोहेकॉ किरण धमके, पोहेकॉ राजेश चौधरी, पो.ना. महेश महाले, पो.कॉ. रविंद्र मोतीराया, पो.कॉ. रोहिदास आगोणे, पो.कॉ. गोपाल पाटील, पो.कॉ. अनिल खोंदले, पो.कॉ. अभिषेक पिसाळ यांनी केली.