जळगाव, प्रतिनिधी । येथील सत्यनिती फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास बोरीकर लिखित ‘मानसिक सक्षम व्हा!’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सत्यनिती फाऊंडेशनद्वारे मानवातील दुर्गुणी शक्तींचा नाश करत मनुष्याला मानवतावादी बनविणारे ‘कर्मव्यवस्था’ संशोधनाचा प्रचार-प्रसार, मानवी हक्क जागरूकता व लोकसंख्या नियंत्रण चळवळ या प्रकल्पा संबंधित उपक्रम राबविण्यात येतात. फाउंडेशनचे अध्यक्ष विलास बोरीकर लिखित ‘मानसिक सक्षम व्हा!’ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शरद पाटील, आनंद कोचुरे व इतर सदस्य उपस्थित होते.