Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पुण्यात इंग्लंडहून परतलेल्या 109 पैकी 50 प्रवासी सापडले

by Divya Jalgaon Team
January 7, 2021
in राज्य
0
देशात २४ तासात जवळपास १४ हजार कोरोना बाधितांची नोंद

पुणे : इंग्लडहून पुण्यात 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत येणाऱ्या प्रवाशांच्या ना कोरोना चाचण्या करण्यात आल्या ना त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा प्रकोप इंग्लंडमध्ये वाढल्यावर या प्रवाशांची शोधाशोध सुरु झाली. त्यापैकी 109 प्रवाशांचा तर कुठेच मागोवा लागत नव्हता. त्यातील पुण्यात राहणाऱ्या 35 जणांचे पत्ते आता सापडले आहेत. आता महापालिकेने त्यांच्या घरी जाऊन तपासणी करायचे ठरवले. महिन्याभरानंतर करण्यात येणाऱ्या या तपासणीला वरातीमागून घोडे असेच म्हणायची वेळ आली आहे.

इंग्लडहून भारतात जे प्रवासी परतून कित्येक दिवस लोटलेत त्यांचा शोध अजूनही सुरूच असल्यामुळे या प्रवाशांसह कोरोनाचा नवीन स्ट्रेन भारतात आणि महाराष्ट्रात देखील वेगाने पसरण्याचा धोका वाढला आहे. इंग्लडहून 1 ते 22 डिसेंबर या कालावधीत पुण्याला येणाऱ्या 542 प्रवाशांपैकी 109 प्रवाशांचा अपुरे पत्ते आणि चुकीच्या मोबाईल नंबर अभावी शोधच लागत नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पुणे पोलिसांवर सोपवण्यात आली. त्यापैकी 50 जणांचे पत्ते शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे आणि पोलिसांनी ते पत्ते महापालिकेकडे सोपवले. त्या 50 पैकी 35 प्रवासी हे पुण्यातील आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यानंतर त्या पत्त्यांवर जाऊन या प्रवाशांची तपासणी करण्याची जबाबदारी त्या त्या भागातील क्षेत्रीय कार्यलयांवर सोपवण्यात आली आहे. या 35 प्रवाशांच्या चाचण्यांना आजपासून सुरुवात होणार आहे.

इंग्लडमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेत 22 डिसेंबर नंतर येणाऱ्या प्रवाशांना तात्काळ क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण त्याआधी आलेले प्रवासी देशभरातील त्यांच्या गावी परतले होते. एअरपोर्ट अथॉरिटीकडून या प्रवाशांना शोधण्यासाठी जी यादी देण्यात आली, ती देखील अपुरी होती. त्यातील कित्येकांच्या नावांपुढे पत्ताच नव्हता, तर काही नावांपुढे त्यांच्या इंग्लंडमधील मोबाईल नंबरची नोंद होती. त्यामुळे ज्या 109 प्रवाशांचा शोध लागत नव्हता, आता त्यापैकी पन्नास जणांचे पत्ते पोलिसांनी शोधून दिल्यावर त्यापैकी 35 प्रवासी पुण्यातील 15 प्रवासी इतर जिल्ह्यांमधील तर काही इतर राज्यांमधील असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेकडून आता तेथील स्थानिक प्रशासनाला पत्र पाठवून त्यांची माहिती दिली जाणार आहे.

आपल्या यंत्रणा कोरोनाच्या मागील आठ-नऊ महिन्यांच्या अनुभवातून काहीच शिकलेल्या नाहीत. इंग्लडहून येणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशनच्याच टप्प्यावर थांबवून, तिथेच त्यांची कोरोना चाचणी करण्याची आणि आवश्यक असल्यास इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याची गरज होती. पण त्या प्रवाशांना कोणताही चाचणी अथवा तपासणी न करता जाऊ देण्यात आल्यानंतर त्यांना शोधण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस आणि प्रशासनावर सोपवण्यात आली.

Share post
Tags: CoronaMarathi NewsPatientPuneपुण्यात इंग्लंडहून परतलेल्या 109 पैकी 50 प्रवासी सापडले
Previous Post

अभियांत्रिकी क्षेत्रच रोजगार निर्मितीमध्ये अग्रेसर

Next Post

आठवडे बाजारातून हॉटेल व्यवसायिकाचा मोबाईल लंपास

Next Post
जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

आठवडे बाजारातून हॉटेल व्यवसायिकाचा मोबाईल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group