जळगाव प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या बांभोरी शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाची १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दादावाडी येथील आठवडे बाजरातून लांबविल्याची घटना घडली. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला.
हॉटेल चालक राजेंद्र शंकर कोळी (वय-३२) हे बांभोरी ता.धरणगाव जि.जळगाव आहे. दादावाडी येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरत असतो. ६ जानेवारी रोजी बुधवार असल्याने ते सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास बांभोरीहून दादावाडी येथील आठवडे बाजारात आले. दादावाडी जैन मंदीरासमोर असलेल्या गौतमा गॅस एजन्सीच्या बाजूला भाजीपाला खरेदी करत असतांना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिश्यातील मोबाईल लांबविला.
सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोबाईल चोरी गेल्याचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी बुधवारी रात्री ८ वाजता तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजेंद्र कोळी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.