वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळवण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना ‘अभियांत्रिकी’ असे म्हटले जाते. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला ‘अभियांत्रिकी’ म्हटले जाते. बांधकामे, यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे ही अभियांत्रिकीची प्रमुख कार्ये आहेत. यासाठी गणिताचा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांसारख्या विविध विज्ञानांचा उपयोग होतो. यातील पदवीधरांना ‘अभियंता’ असे म्हणतात.
कुशल रोजगारनिर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा दबदबा अजूनही कायम आहे. स्किल इंडियाच्या अहवालानुसार मागील वर्षी कुशल रोजगारनिर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा वाटा 57.09 टक्के होता. अभियांत्रिकी हे एक व्यावसायिक क्षेत्र आहे; ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सिद्धांत वापरून संशोधन, डिझाइन आणि निर्मिती केली जाते. यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून यंत्र, रचना, प्रणाली इत्यादींचा उपयोग करून समाजाच्या समस्या सोडविण्याचे किंवा सामाजिक/वैयक्तिक कार्यपद्धती सोयीस्कर करण्याची कार्ये केली जातात. समाजात असे एकही क्षेत्र नाही; ज्यामध्ये अभियांत्रिकी ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग होत नाही.
अभियांत्रिकी क्षेत्राची निवड विद्यार्थ्यांनी का करावी? याचा जर सखोल विचार केला, तर त्यामध्ये विविध कारणे आपल्या दृष्टिपथास पडतील. जसे –
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी
समाजाभिमुख समस्यांवर संशोधनाची संधी
कामाचे समाधान
रोजगाराच्या उत्कृष्ट आणि विविध संधी
समाजाचे ऋण फेडण्याची संधी
जबाबदारीचे/आव्हानात्मक काम
बौद्धिक विकास
सर्जनशील विचार
तांत्रिक आणि वैधानिक शोध
आर्थिक सुरक्षा
प्रतिष्ठा
व्यावसायिक वातावरण
स्किल इंडियाच्या अहवालानुसार जरी अभियांत्रिकी क्षेत्राचा कुशल रोजगारनिर्मितीमध्ये दबदबा असला, तरीही माझा शेजारी, माझ्या बहिणीचा, माझ्या भावाचा मुलगा/मुलगी अभियांत्रिकीनंतर घरीच बसून आहे, काहीही काम (नोकरी) करीत नाही, हे सांगणार्यांचे प्रमाणही तुम्हाला लक्षणीय मिळेल.
एका बाजूला स्किल इंडियाचा अहवाल आणि काही जागांची वस्तुस्थिती हे परस्पर विरोधाभास दाखवितात. नुकत्याच बारावी झालेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था या वेळी नक्कीच यक्षप्रश्नाला सामोरे जाण्यासारखी असते. स्किल इंडियासारख्या उच्च संस्थेच्या अहवालाला ग्राह्य धरून आपले क्षेत्र निवडावे की लोकांनी दिलेले उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून अभियांत्रिकी क्षेत्राला दूर लोटायचे?
इंग्रजीमध्ये म्हटले जाते – ‘इंजिनिअर्स आर ड्रीम ऑफ सोसायटी, इंजिनिअर्स आर नीड ऑफ सोसायटी’ या वाक्याची खरी प्रचिती आपण आता ‘कोविड-19’च्या भयंकर महामारीमध्ये घेतलीच असेल. जगाच्या कानाकोपर्यांमध्ये इंजिनिअर्स हे कोविड योद्ध्याप्रमाणे वेगवेगळी यंत्रे आणि उपकरणे बनवून जगाला कोरोनापासून वाचविण्याचे काम करीत होते. भारतामध्येही विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत रुग्णांकरिता व्हेंटिलेटर बनविले; त्याचप्रमाणे जळगावमध्येही रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरोना व्हायरसपासून कोविड योद्ध्यांचे दैनंदिन उपयोगातील साहित्य निर्जंतुकीकरण करण्यासाठी ई अॅण्ड टीसी अभियांत्रिकी विभागाकडून यूव्ही-सी बॉक्सची निर्मिती करण्यात आली. तसेच यंत्र अभियांत्रिकी विभाग आणि प्रथम वषर्र् अभियांत्रिकी विभागाकडून स्वयंचलित आणि फूट ऑपरेटेड सॅनिटायझर मशिन आणि थ्री डी प्रिंटेड फेस मास्कची निर्मिती केली. यावरून आपल्याला लक्षात येते की, स्किल इंडियाचा अहवाल खोटे सांगत नाही आणि उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाविद्यालय संपूर्ण भारताप्रमाणे जळगावमध्येही उपलब्ध आहे.
जेव्हा आपल्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असतो, त्या वेळी आपण खरोखर त्याच्या गुणवत्तेचा विचार करतो का? सर्वसाधारणपणे फक्त कमी फी आणि ज्यांना घरापासून लांब राहायचे आहे, ते पुणे किंवा मुंबई या शहरांमध्ये महाविद्यालयांना प्रामुख्याने प्राधान्य देतात. पण, एकंदरीत जर आपण विचार केला, तर अभियांत्रिकी महाविद्यालय फक्त पुणे किंवा मुंबईमध्ये असणे, हे काम उत्तम अभियांत्रिकी शिक्षणाचे मानक आहेत का? नक्कीच नाही. फक्त अभियांत्रिकी पदवी घेण्याकरिता कसलेही मानक विचारात न घेता जर आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, तर चार वर्षांनंतर आपणही दुसर्या प्रभागात मोडून उच्चशिक्षित बेरोजगार म्हणूनच राहू.
अभियांत्रिकी क्षेत्र विश्वातले एक विस्तृत क्षेत्र आहे; ज्यामध्ये सहभागी होण्याची संधी प्रत्येक अभियंत्यास मिळू शकते. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्या सभोवताली घडण्याच्या सर्व घडामोडींमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा सहभाग हा असतोच. या सर्व क्षेत्रांत आपले रोजगाराभिमुख योगदान देण्यासाठी खालील काही गोष्टी या शिक्षणासोबत अंगीकृत करणे गरजेचे असते. जसे –
संख्या कौशल्य
समस्याचे निराकरण करण्याची क्षमता
संभाषण आणि सांघिक कार्यपद्धतीमध्ये योगदान देणे
नेतृत्वक्षमता
सर्जनशीलता
अभियांत्रिकी शिक्षणासाठी महाविद्यालयाची निवड करताना उत्कृष्ट अभ्यासक्रम आणि शिक्षणासाठी निकषानुसार काही मानक तपासणे गरजेचे असतात. जसे – महाविद्यालयाला ‘नॅक’ संस्थेचे मानांकन आहे का? जर आहे तर त्याची ग्रेड काय आहे? ‘अ’ मानांकन असलेले महाविद्यालय आपण चांगले म्हणू. महाविद्यालय हे स्वायत्त (ऑटोनॉमस) आहे की नाही, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर महाविद्यालय रोजगारासाठी (कॅम्पस प्लेसमेंट) संधी उपलब्ध करून देतात की नाही आणि हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. वरील सर्व गोष्टींचा विचार करून उत्तर महाराष्ट्र विभागात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसमोर अभियांत्रिकी शिक्षणासाठी उपलब्ध आहे..