Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली फिट!, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

by Divya Jalgaon Team
January 7, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली फिट!, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय (BCCI) चा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची तब्येत आता स्थिर आहे, त्यामुळे त्याला कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. गांगुलीला बुधवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, पण त्याने आणखी एक दिवस रुग्णालयात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

‘गांगुली आता क्लिनिकली फिट आहे. त्याला चांगली झोप लागत असून तो जेवणही व्यवस्थित करत आहे. त्याला आणखी एक दिवस रुग्णालयात राहायचं आहे. त्यामुळे त्याचा मुक्काम आणखी एक दिवस वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’ अशी प्रतिक्रिया वूडलॅन्ड रुग्णालयाच्या सीईओ डॉक्टर रुपाली बसू यांनी दिली. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या डिस्चार्जची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तसंच त्याला आणि त्याच्या कुटुंबाला घरी गेल्यानंतर कोणती औषधं घ्यायची, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

‘आता गांगुलीची तब्येत चांगली आहे, त्याला कोणताही त्रास होत नाही. डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. रुग्णालयाचे डॉक्टर घरीही त्याच्या तब्येतीची काळजी घेतली. रुग्णालय किंवा त्याच्या घराबाहेर नागरिकांनी गर्दी करू नये,’ असं आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आलं आहे.

गांगुलीला मागच्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका आला होता, यानंतर त्याच्यावर एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. शनिवारी गांगुलीच्या रिपोर्टमध्ये हृदयाशी संबंधित ट्रिपल वेसेल डिसिज असल्याचं निष्पन्न झालं. गांगुलीच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक झाले होते. त्याची दुसरी एन्जियोप्लास्टी नंतर होण्याची शक्यता आहे.

लोकप्रिय हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर देवी शेट्टी यांनी गांगुलीवर उपचार करणाऱ्या 13 डॉक्टरांच्या टीमची भेट घेतली. या डॉक्टरांना भेटल्यावर शेट्टी म्हणाले, ‘गांगुली लवकरच फिट होईल आणि त्याचं हृदय 20 वर्षांचा असतान जसं होतं, तसंच चालेल. गांगुलीच्या हृदयाला कोणताही धोका नाही. भविष्यातही या दुखण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तो सामान्य आयुष्य जगू शकतो आणि व्यायामही करू शकतो.’

सौरव गांगुलीला पुन्हा एन्जियोप्लास्टीची गरज आहे का? असा प्रश्न डॉक्टरांना विचारण्यात आला, तेव्हा हे सगळं सौरव गांगुलीवर अवलंबून आहे. गोळ्या घेऊनही त्याच्यावर उपचार केले जाऊ शकतात, पण एन्जियोप्लास्टी करणं योग्य राहिल. याचा निर्णय त्याला घ्यायचा आहे, पण त्याने दोन आठवडे थांबावं आणि मग ठरवावं, असं मत डॉक्डरांनी मांडलं.

Share post
Tags: #KolkataMarathi NewsSaurav GangulySportटीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली फिट!रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
Previous Post

त्या महिलेच्या मृत्यूनंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्रातील गांधीजी याविषयावर झाला दाम्पत्याची पीएच.डी.

Next Post
महाराष्ट्रातील गांधीजी याविषयावर झाला दाम्पत्याची पीएच.डी.

महाराष्ट्रातील गांधीजी याविषयावर झाला दाम्पत्याची पीएच.डी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group