जळगाव प्रतिनिधी । राज्यात भाजपा शिवसेनेवर मोठी झाली आहे. शिवसेनेवर टिका नाही करणार तर कोणावर करतील असा टोला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जात आहे. काही शेतकऱ्यांना पेमेंटही थकित राहिला आहे. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यांचे पेमेंट लवकरात लवकर बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा शिवसेनेवर टिका करत असल्याचा प्रश्न उपस्थित केला असता, त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपा शिवसेनेमुळे मोठी झाली आहे. भाजपा शिवसेनेवर टिका करणार नाही तर कोणावर टिका करेल. टिका करण्याशिवाय भाजपाकडे काही काम अशी टोला पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी लगावला.