जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात शहरातील धर्मरथ फाऊंडेशनने उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल आज बुधवारी महानगरपालिका प्रशासनातर्फे आयुक्त पवन पाटील यांच्या उपस्थितीत धर्मरथ फाऊंडेशनचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
शहरातील धर्मरथ फाऊंडेशनने कोरोनाच्या महामारीत सुरूवातीच्या काळापासून जळगावकरांसाठी महापालिकासोबत सामाजिक कामांमध्ये आपली माणूसकी जपून नागरीकांसाठी काम केले. शहरातील शिवाजी नगर परिसरात औषध फवारणी, स्मशानभूमीत सॅनिटायझरची फवारणी, परिसर निर्जंतुकीकरण करणे, आर्सेनिक अल्बम-३० गोळ्या वाटप करणे, गरजूंना मोफत जेवण वाटणे, तसेच रेल्व स्थानका कोवीड स्पेशल ट्रेनमध्ये प्रवाश्यांना जेवण व पाण्याची व्यवस्था फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले.
आरोग्यसेवक व मनपा सफाई कर्मचारी यांचा सत्कार केला अशी बरेच काम करण्याचा प्रयत्न धर्मरथ फाउंडेशन त्यांचे सर्व पदाधिकारी व सदस्यच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. या सर्व कार्याची दखल घेऊन जळगाव महानगरपालिकाचे उपायुक्त पवन पाटील, प्रभाग अधिकारी विलास सोनवणी यांच्या माध्यमातून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी धर्मरथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, संतोष भिताडे, हिरामण तरटे, विपीन पवार, निशांत पाटील, प्रकाश मुळीक, ईश्वर शिंदे, तुषार सूर्यवंशी, धर्मद्र चौधरी, सागर बडगुजर, दीपक पवार, मिलिंद बडगुजर, प्रमोद महांगडे, सुनील महांगडे, दिनेश पाटील, विशाल महांगडे, ओम महांगडे आदी उपस्थित होते.