जळगाव,:- भौगोलिक चिन्हांकन/मानांकन प्राप्त कृषि उत्पादनांच्या नोंदणी, प्राचार प्रसिध्दी व मुल्यसाखळी विकासीत करणेसाठी अर्थसहाय्य योजना अंतर्गत 4 जानेवारीला जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या दालनाशेजारी सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जिल्ह्यातील भरताची वांगी व केळी प्रमाणे पुरणपोळी, (मांडे) पोथीची पाने, बिबडीचा घाटा, चमेली व मेहरुणच्या बोरांना एक विशिष्ट ओळख मिळवून देण्यासाठी भौगोलिक चिन्हांकनासाठी (जीआय मानांकन) प्रस्तावीत करण्यात आले.
जळगावच्या भरताची वांगी व केळीला जीआय मानांकन मिळालेले आहे. त्याचप्रमाणे वैशिष्ट असलेल्या अनेक बाबी जळगाव जिल्हयात आहेत. ज्या चवीने खाल्ल्या जातात व त्यांची चर्चा होते. त्यांना जिल्हयाबाहेर देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील बाजरपेठ मिळू शकते. केळी व भरताच्या वांग्यांना जीआय मानांकन मिळाल्याने बाहेरच्या जिल्हायातील व्यक्तीला जळगावचे भरीत म्हणून विकता येणार नाही. तसेच जळगावचे मांडे व खापरावरच्या पुरणपोळया प्रसिध्द आहेत. बिबडीचा घाटा जळगाव जिल्हयातच बनवला जातो. धरणगाव तालुक्यातील अनोरे व भडगांव तालुक्यातील लोणपिराचे गावात पोथीच्या पानांचे उत्पादन घेतले जाते. सदर पिकाची त्यांची पोथीची पाने, गवती चहा इतरांपेक्षा वेगळी आहेत. सदर पिकांची पारंपारीकता, स्वाद, आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे इत्यादी नोंदी घेणेबाबाबत चर्चा जीआय मानांकन मिळल्यानंतर या खाद्यपदार्थाचा इतर कोणीही ब्रँडिग करुन शकणार नाही. त्यासाठी जीआय मानांकन परवानगी मिळणे आवश्यक असल्यामुळे जी.आय.नामांकनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रा.गणेश हिंगमिरे, जी.एम.जी.सी. पुणे यांनी सविस्तरपणे सादरीकरणाद्वारा सभागृहात दिली. श्री. गणेश हिंगमिरे, यांनी जीआय बाबतची कार्यप्रणाली, महत्व, कृषि पिके व उपपदार्थ यांना मिळणारा आर्थिक फायदा या बाबत सविस्तरपणे माहिती दिली. यापुर्वी मिळालेल्या जीआय पिक केळी व भरताचे वांगे यामध्ये जास्तीत जास्त शेतक-यांची सभासद म्हणुन नोंद घेणेसाठी महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ यांचेकडील योजनेचा फायदा घेऊन फक्त रु. 10/- भरणे आवश्यक असल्याने सदरची मोहीम संबधी नवनिर्मिती शेतकरी मंडळ, असोदा ता.जि.जळगाव व निसर्गराजा कृषि विज्ञान मंडळ, तांदलवाडी, ता. रावेर जि. जळगाव गटानी करण्याचे आवाहन देखील श्री. गणेश हिंगमिरे यांनी केले.
याव्यतिरिक्त बारेस्था आंबा, श्रावण मुग, वालपापडी या पिकांना व बहादरपुरची गोंधडी व इतर आवश्यक पारंपारीक बांबीना देखील जी.आय. नामांकन करता येईल याबाबत देखील सविस्तरपणे चर्चा करण्यात येईल.
यावेळी श्री.अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव, डॉ.बी.एन.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगाव, श्री. संभाजी ठाकुर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव श्री. अनिल व्ही भोकरे, कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय,जळगाव, श्री. बी.बी. देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक, पणन महामंडळ, नाशिक तसेच कृषि विभागातील प्रा.किरण जाधव, विषय विशेषज्ञ इंजि.वैभव सुर्यवंशी, विषय विशेषज्ञ कृ.वि.के,जळगाव श्री.श्रीकांत झांबरे, ताकृअ, जळगाव, व्ही.डी.शिंदे कृविअ, जळगाव, श्री.मधुकर चौधरी प्र.उपसंचालक (आत्मा), कु.मु.तडवी, प्र.उपसंचालक (आत्मा), श्री. संजय हि पवार, प्रकल्प विशषज्ञ कृषि ना.दे.कृ.स.प्र, जळगाव श्री.डी.आर.ठाकुर, तंत्र अधिकारी, जिअकृअ, जळगाव डी.ई.नगरे एस.सी.पाटील तसेच श्री. मधुकर नामदेव देशमुख आनोरे ता.धरणगाव, गोरख जुलाल पारधी जेणदिगर ता.चाळीसगाव श्री.संजय बाळकृष्ण पाटे रांजणगाव ता.चाळीसगाव श्री. परशुराम भिकन महाले ता.चाळीसगाव श्री.समाधान रतन पाटील, अव्हाणे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.