जळगाव प्रतिनिधी । जळगावातील मेहरूण परिसरातील दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल असून त्या चोरट्यास एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आले.
संशयित चोरटा गोपाळ भगवान कोळी (वय-50) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चार वर्षापुर्वीच म्हणजेच 2016 मध्ये चोरुन आणलेली दुचाकी जोशीवाडा येथील गोपाळ कोळी वापरत असल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती.
बकाले यांनी त्याच्या पथकातील विजयसिंग पाटिल, जितेंद्र पाटिल, नितीन बाविकस्कर, राहुल पाटिल, प्रितम पाटील अशांच्या पथकाला रवाना केले होते. संशयीताचा शोध घेत असतांना तो, जळगाव शहरात नसुन किनोद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने यावल तालूक्यातील किनोद येथे जाऊन गोपाळ भगवान कोळी याला अटक केली. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांना सोपवण्यात आले आहे.