जळगाव :- मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली अर्पण करून सर्वांनी ज्येष्ठ पत्रकारांसाठी मानधन योजनेची कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शासना दरबारी लढा तीव्र करण्याचा उपस्थित पत्रकारांनी केला. जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात दुपारी हा कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दिलीप शिरुडे यांनी पत्रकार दिन छोट्या खाणी साजरा करण्याबाबत भूमिका विशद केली. आगामी काळात संघातर्फे एक दिवसीय कार्यशाळा घेण्याबाबत जाहीर केले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधना संदर्भात शासनाने ठरवलेल्या जाचक अटी शिथिल करण्यातसंदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक श्री दिलीप पांढरपट्टे यांच्याशी भ्रमणध्वनीवर मागण्याबाबत विस्तृत चर्चा झाल्याचे सांगितले.
जिल्हातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार,पत्रकार व कुटुंबीय सदस्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमानंतर ज्येष्ठ पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री राहुल पाटील यांना दिले व पत्रकारांच्या भावना शासन पातळीवर पोहोचवण्याबाबत अवगत करण्यात आले. याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजयबापू पाटील,विश्वस्त मंडळाचे कार्यवाहक अशोक भाटिया, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरुडे, ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी, सरचिटणीस रितेश भाटिया, खजिनदार फारुख शेख, उपाध्यक्ष पांडुरंग महाले, संघटक संजय निकुंभ, ज्येष्ठ पत्रकार चंदू नेवे, अविनाश चव्हाण, कमलाकर फडणीस, ताराचंद पुरोहित, शब्बीर सैय्यद, प्रवीण बारी ई.उपस्थित होते.