जळगाव प्रतिनिधी । ममुराबाद गावाजवळील रोडवर मयत स्थितीत बिबट्या आढळून आल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग कर्मचारी आणि तालुका पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
तालुक्यातील ममुराबाद गावाजवळील नांद्राफाट्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरीकांना आज ६ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रोडवर बिबट्या मयत स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याचा मृत्यू कसा झाला याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृत बिबट्या मृतदेहाचे पंचानामा करण्याचे काम सुरू होते. यावेळी गावातील नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. दुसरीकडे घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झालेली होती. तर हा बिबट्या याठिकाणी मृत झालेला नसून, त्यास मारून या भागात टाकले असल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.