उत्तरप्रदेश : निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. पण यावेळी दिल्लीत नव्हे तर उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेवर फक्त सामूहिक बलात्कारच करण्यात आला नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड टाकण्यात आला. एवढंच नव्हे तर तिचा पाय देखील तोडण्यात आला होता. दरम्यान, या सर्व बाबी महिलेच्या पोस्टमॉर्टम अहवालानंतर उघड झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांचा ढिसाळ कारभार देखील उघडकीस आला आहे. या घटनेमुळे लोक संतप्त झाले आहेत त्यांनी नराधम आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. महिलेला जखमी अवस्थेत तिच्या घराबाहेर फेकण्यात आलं. बदायूं येथील उघैती पोलीस स्टेशन परिसरातील एका खेड्यातली ही लज्जास्पद घटना आहे. इथे राहणारी एक महिला जवळच्या खेड्यातील मंदिरात गेली होती पण बराच वेळ झाला तरी ती परत आली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला.
मात्र, तरीही ती न सापडल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याचवेळी रात्री १२ वाजेच्या सुमारास एका कारमधून दोन व्यक्तींनी या महिलेला जखमी अवस्थेत तिच्या घरासमोर आणून टाकलं आणि तिथून पळ काढला. दरम्यान, त्या रात्रीच पीडित महिलेचा मृत्यू झाला. असे म्हटले जात आहे की, त्याआधी आरोपी महिलेला उपचारासाठी चंदौसी येथे घेऊन गेले होते. पण नंतर त्यांनी तिला घराबाहेर आणून टाकलं.
या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलं होतं, महिला डॉक्टरसह तीन डॉक्टरांच्या पॅनेलने दिलेल्या अहवालनुसार महिलेच्या गुप्तांगाला गंभीर जखम झाल्याचे आढळून आले. रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, तिच्या गुप्तांगात एक रॉड टाकण्यात आला होता. ज्यामुळे तिच्या आतील अवयवांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच तिच्या शरीरवर देखील अनेक मारहाणीच्या खुणा आहेत. तर पायाच्या बाजूने तिची हाडे देखील मोडली आहेत. महिलेचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
तिघांवर खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल
दरम्यान, पीडित महिलेच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, तक्रारीनंतरही पोलीस घटनास्थळी पोहचले नाही. तर आता या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह उघौती पोलीस स्टेशन परिसरात सापडला. हत्या व बलात्कारप्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी उघैतीच्या एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. तर आरोपींच्या अटकेसाठी काही विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.