जळगाव – ‘परिसरातील पक्ष्यांची ओळख’या अभिनव उपक्रमात सहभागी व्हा ! मित्र मैत्रिणींनो आपल्या परिसरात दिसणाऱ्या पक्ष्यांची ओळख आपणास करून देण्यासाठी आम्ही निसर्गमित्र जळगांव तर्फे इ.५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘परिसरातील पक्ष्यांची ओळख’हा उपक्रम घेऊन येत आहोत.या उपक्रमात आपण स्वतः भाग घ्या व इतर मित्र मैत्रिणींना सहभागी करा.त्यासाठी ही पोस्ट सर्वत्र पाठवा.
उपक्रमाचा उद्देश:- आपल्या परिसरात काही पक्षी बारा महीने आढळतात, पण त्या पैकी फक्त कावळा,चिमणी अशा काही ठराविक पक्ष्यांची नावं आपल्याला माहीत असतात.मात्र अन्य पक्षी दिसत असूनही त्यांची ओळख नसते.या पक्ष्यांची ओळख व्हावी,ही माहिती स्वतः मिळवावी व यातून पक्षी निरीक्षणाचा छ्ंद जडावा या साठी हा उपक्रम घेत आहोत.
उपक्रमात सहभाग कसा घ्याल :- आज १ जानेवारी २०२१ रोजी ३० पक्ष्यांच्या छायाचित्रांचा अल्बम व उत्तरपत्रिका तुमच्या दिलेल्या व्हाट्सएपवर पोस्ट करीत आहोत. उत्तरपत्रिकेची झेरॉक्स काढून त्यांवर स्पर्धकाचे पूर्ण नाव, गाव, जिल्हा, इयत्ता व तुमचा व्हाट्सएप क्रमांक लिहा.
आपण अल्बम मधील पक्षी ओळखून त्या पक्ष्यांच्या क्रमानुसार उत्तर पत्रिकेतील त्या क्रमांकापुढे त्या पक्ष्याचे मराठी व इंग्रजी नाव लिहा. या सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचा फोटो काढून तो दि.२५ जानेवारी २०२१ पर्यंत आमच्या व्हाट्सएप क्र.8999809516 वर पाठवा. दि. ३१ जानेवारी रोजी सर्व स्पर्धकांना व्हाट्सएपवर सहभागाचे प्रमाणपत्र पोस्ट केल जाईल. सर्व उत्तरे बरोबर देणार्यांना विशेष प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येईल. ही पोस्ट सर्वत्र पाठवा व इतर मित्र मैत्रिणींना सहभागी करा.
पक्ष्यांची माहीत नसल्यास ती मिळवण्यासाठी काय कराल :- स्वतः प्रयत्न करा *शाळेच्या व सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन माहिती गोळा करा* नेट वर शोधा,विकिपीडिया बघा* आपल्या शिक्षकांना विचारा *गावातील झुलॉजीच्या प्राध्यापकांना भेटा *गावातील पक्षीमित्रांना भेटा.
आपले
पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ , निसर्गमित्र जळगाव, व्हाट्सएप क्र.8999809516
सोबत – ३० पक्ष्यांच्या छायाचित्रांचा अल्बम व उत्तरपत्रिका