Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अ‍ॅड. पाटील यांना धमकविल्याप्रकरणी गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
January 5, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
कोरोना हाताळण्यात राज्य सरकार १०० टक्के अयशस्वी

जळगाव प्रतिनिधी । मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. मविप्रच्या वादातून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना धमकावल्या प्रकरणी निंभोरा येथून पुण्यात वर्ग करण्यात आलेल्या प्रकरणात माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यावर अखेर तेथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी त्यांनी निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता. या फिर्यादीत अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी म्हटले होते की, ते जळगाव येथील मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत. दरम्यान त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.

ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसंच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत असलेल्या एका फ्लॅटवर नेले. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्याला देखील त्यांनी याठिकाणी डांबले. तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती. हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता. परंतु, त्यांनी तक्रार उशिरा केली आहे.

याप्रकरणी आ. गिरीश महाजन, रामेश्‍वर नाईक, निलेश भोईटे यांच्यासह एकूण २८ जणांवर निंभोरा येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन तो कोथरूडला वर्ग करण्यात आला होता. यानंतर आता कोथरूड स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Share post
Tags: Ad. Vijay PatilcrimeGirish MahajanJalgaonMarathi Newsअ‍ॅड. पाटील यांना धमकविल्याप्रकरणी गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल
Previous Post

यावल तालुक्यातील गावांमध्ये ग्राहकांना महावितरणकडुन अवाजवी बिलांची वसुली

Next Post

तालुक्यातील बोदवड येथे एलईडी, होम थिएटर चोरी

Next Post
चोरट्यांनी एक नवे तर तब्बल चार ठिकाणी केली घरफोडी

तालुक्यातील बोदवड येथे एलईडी, होम थिएटर चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group