बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील बोदवड शहरापासूनजवळ असलेल्या एका ढाब्यामधून एलईडी आणि होम थिएटरची चोरी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बोदवड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड शहरात जय ढाब्याचे मालक अजय बाळुसिंग पाटील (वय-३०) रा. जय माती दी नगर बोदवड यांचे आहे. ४ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता ते ढाबा बंद करून घरी निघून गेले. सकाळी १० वाजता कामानिमित्त आले असता ढाब्यातील ४२ इंची क्राऊन कंपनीचा १८ हजार रूपये किंमतीचा एलईडी आणि ४ हजार रूपये किंमतीचा होम थिएटर असा एकुण २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोना सचिन चौधरी करीत आहे.