Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल तालुक्यातील गावांमध्ये ग्राहकांना महावितरणकडुन अवाजवी बिलांची वसुली

by Divya Jalgaon Team
January 5, 2021
in जळगाव
0
आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

यावल (रविंद्र आढाळे) – तालुक्यातील दहिगाव येथे व परिसरात वीज कंपनीकडून ग्राहकांना अवाजवी अव्वा की सव्वा विज बिल आल्याने ग्राहक महावितरण वीज कंपनीवर प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत . दरम्यान महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे संत्पत ग्राहक पर्याय मीटर बंद करून वीज चोरी करण्याच्या मानसीकतेत दिसुन येत आहे.

दहीगाव सावखेडा सिम कोरपावली महेलखेडी या गावांमधील ग्राहकांना वीज कंपनीकडून वीज बिलांची आकारणी मोठ्या प्रमाणात झाल्याने वीज बिले भरणे ग्राहकांना अवघड होत आहे. सर्वसामान्य नागरीक सध्या परिस्थितीत कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रादुर्भावाने रोजगार व उत्पन्न अत्यल्प झालेले असल्याने हातावर पोट भरणाऱ्या व मोलमजुरी करणाऱ्यांना विज बिल भरणे हे जवळपास अशक्य झालेले आहे.कोरोना महामारीपुर्वी विज ग्राहकांना पन्नास शंभर ते दोनशे रुपये वीजबिल येणाऱ्यांना मागील ५ते ६ महीन्यापासुन दोन ते तीन हजार रुपये पर्यंत वीज बिल आलेले असल्याने यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे .

सदर ग्राहकांना महावितरण वीज कंपनीने त्वरित हे पाठवलेले अवाजवी बिल दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक कडुन व्यक्त करीत आहे. शासनाने अल्पभूधारक तथा मजुर वर्गांना मोफत वीज मीटर बसून दिलेले आहेत वीज चोरीला आळा बसावा हा यामागील उद्देश होता आणि आहे मात्र याच मीटर धारकांना वीज कंपनीने हजारो ने वीज बिले दिली असल्याने ग्राहकांना विजेचा धक्काच बसला असुन परिसरात या विषयाला घेवुन नाराजी व्यक्त करीत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे उर्जामंत्री यांनी ग्राहकांना कोरोना काळातील विजबिल माफी करण्याचा निर्णय घेतलेला होता या निर्णयाला मात्र चुकारा देण्यात आलेला असून राज्यातील नागरीकांचा भ्रमनिराश झाला असुन आता महावितरण कंपनीच्या बिल वसुलीसाठी वीज कंपनीने हे आदी पासुनच आर्थीक संकटात सापडलेल्या ग्राहकांना सक्तीची विज बिल वसुली साठी वेठीस धरल्याचे बोलले जात असल्याने दहीगाव व परिसरातील गावातील ग्रामस्थ कमालीचे धास्तावले आहे .

Share post
Tags: JalgaonMahavitaranMarathi NewsYawalयावल तालुक्यातील गावांमध्ये ग्राहकांना महावितरणकडुन अवाजवी बिलांची वसुली
Previous Post

के. एल. राहुल दुखापतग्रस्त; मालिकेतून बाहेर

Next Post

अ‍ॅड. पाटील यांना धमकविल्याप्रकरणी गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल

Next Post
कोरोना हाताळण्यात राज्य सरकार १०० टक्के अयशस्वी

अ‍ॅड. पाटील यांना धमकविल्याप्रकरणी गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group