Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

के. एल. राहुल दुखापतग्रस्त; मालिकेतून बाहेर

by Divya Jalgaon Team
January 5, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
के. एल. राहुल दुखापतग्रस्त; मालिकेतून बाहेर

के. एल. राहुल दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. मेलबर्नमध्ये सरावादरम्यान राहुलच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील सिडनी आणि ब्रिस्बेन टेस्टसाठी राहुल उपलब्ध असणार नाही.

राहुल मायदेशी परतणार असून, बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत असेल.

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका जिंकली तर भारतीय संघाने ट्वेन्टी20 मालिकेवर कब्जा केला. बॉर्डर-गावस्कर मालिकेत अडलेड कसोटीत भारतीय संघाचा 36 धावातच ऑलआऊट झाल्याने नामुष्की ओढवली.

या पराभवातूवन बोध घेत भारतीय संघाने मेलबर्न कसोटी जिंकत दमदार पुनरागमन केलं. चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी झाली असून, दोन सामने बाकी आहेत.

तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरू होत आहे.

या मालिकेसाठी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी यांना अडलेड आणि मेलबर्न टेस्टमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने राहुल उर्वरित टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता होती. मात्र आता राहुल दोन्ही टेस्ट खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दीड महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएल स्पर्धेत राहुलने सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनला देण्यात येणारा ऑरेंज कॅपचा पुरस्कार पटकावला होता.

सहा वर्षांपूर्वी राहुलने ऑस्ट्रेलियातच टेस्ट पदार्पण केलं होतं. 2015 मध्ये सिडनी इथे राहुलने टेस्टमधली पहिली शतकी खेळी साकारली होती.

राहुलने 36 टेस्ट, 35 वनडे आणि 45 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

36 टेस्टमध्ये राहुलने 34.58च्या सरासरीने 2006 रन्स केल्या असून यामध्ये 5 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करण्याची क्षमता असलेला राहुल विकेटकीपिंगही करत असल्याने त्याची उपयुक्तता जास्त होती.

टीम इंडियाचा अनुभवी बॉलर इशांत शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने तो बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळू शकला नाही.

स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध भुवनेश्वर कुमार आयपीएल स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तोही या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता.

अडलेड कसोटीत पॅट कमिन्सचा उसळता चेंडू हातावर आदळल्यामुळे फास्ट बॉलर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला. शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.

मेलबर्न टेस्टदरम्यान मांडीचे स्नायू दुखावल्याने दुसऱ्या इनिंग्जमध्ये फास्ट बॉलर उमेश यादवने माघार घेतली. उमेशच्या दुखापतीसाठी एक्सरे काढण्यात आले.

दरम्यान आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा क्वारंटीन पूर्ण करून संघात दाखल झाला आहे. रोहितची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे आणि तो उर्वरित दोन कसोटीत खेळेल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अडलेड टेस्टनंतर पॅटर्निटी लिव्हसाठी मायदेशी परतला. बाळंतपणावेळी पत्नी अनुष्का हिच्यासोबत असण्यासाठी विराटने पॅटर्निटी लिव्ह घेतली आहे.

Share post
Tags: Marathi NewsSportके. एल. राहुल दुखापतग्रस्त; मालिकेतून बाहेर
Previous Post

ग्रामपंचायतीत गोदावरी ग्रुपचे तीन विद्यार्थी बिनविरोध निवड!

Next Post

यावल तालुक्यातील गावांमध्ये ग्राहकांना महावितरणकडुन अवाजवी बिलांची वसुली

Next Post
आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

यावल तालुक्यातील गावांमध्ये ग्राहकांना महावितरणकडुन अवाजवी बिलांची वसुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group