शिरूर (प्रशांत पवार) – आज शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांना २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. आमदार कार्यसम्राट अशोक बापु पवार यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड आहे.
कार्यसम्राट आमदार मा.श्री.अशोक बापु पवार यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत वडगाव रासाई मांडवगण फराटा सादलगाव या 11 कोटी 15 लाख रुपयांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या शुभ हस्ते पार पडला.या वेळी आमदार अशोक बापू पवार यांनी योजना कार्यान्वित झाल्या नंतर संपूर्ण यंत्रणा ची पाहणी केली व घोड धरणातून येणारे पाणी साठवण तलावात साठवून ते फिल्टर होणारे युनिट ची पाहणी केली व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या व या माध्यमातून तीन गावातील जनतेला स्वच्छ पाणी मिळणार आहे. हिवाळी अधिवेशनासाठी आमदार मा.श्री.अशोक पवार सभाध्यक्ष तालिकेवर नियुक्ती झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा चालवण्यासाठी जबाबदारी आली आणि त्यांनी ती पार पाडली.
शिरूर-हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष सार्वजनिक उपक्रम समिती ॲड् श्री अशोक रावसाहेब पवार यांच्या मागणीला मोठे यश. प्रथम शिक्षिका सावित्रीबाईफुले यांची जयंती दिवस “शिक्षकादिन” म्हणून साजरा करण्यात आहे, त्यासाठी मंत्रीमंडळाने मंजुरी ही दिली आहे.सौ. प्रतिभाताई शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन स्वाक्षरी मोहिमेचे नियोजन करण्यात आले. अशा प्रकारे अशोक बापु पवार यांचे कार्य आहे. त्यामुळे त्यांना कार्यसम्राट आमदार म्हणुन ओळखले जाते.रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी विराजमान होण्यास २२ पुर्ण झाले त्याबदल शिरूर -हवेली लोकसभा व विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा…..