जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये लग्नाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४२ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील फुलेमार्केटमध्ये वर्षीय महिला ह्या त्यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्या आपल्या नातलगांसह खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. फुले मार्केटमधील मोहन क्लॉथ सेंटर येथे सात हजार रूपयांच्या साड्या घेतल्या. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या दोन तरूणी चंदूलाल रसवंती येथे नातेवाईकाला भेटण्यासाठी गेल्या. मंगलाबाई पाटील यांच्याकडील पर्समध्ये आणलेले ५० हजार रूपयांची पैकी ८ हजार रूपयांची खरेदी केली. त्यानंतर उर्वरित ४२ हजार रूपयांची रोकड पर्समध्ये ठेवली. दुसऱ्या दुकानाकडे जात असतांना अज्ञात चारेट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ४२ हजार रूपयांची रोकड लांबविले. त्यांना कुणाचातरी धक्का लागल्याने त्यांनी पर्स पाहिली असता पर्समध्ये ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले.
त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. यावेळी स्थानिक पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांनी सर्व दुकानांचे सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी मंगलाबाई पाटील यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.