एरंडोल – येथील नगरसेवक व भूलवैद्यकशास्त्रतज्ञ् डॉ . नरेंद्र ठाकूर ह्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी , जळगाव जिल्हा वैद्यकीय आघाडी ( ग्रामीण )च्या मुख्य जिल्हा संयोजक पदी नियुक्ती दि.३० डिसेंबरला करण्यात आली.
जिल्हा भाजप अध्यक्ष( ग्रामीण )तथा आमदार राजूमामा भोळे ह्यांनी वसंत स्मृती ह्या जिल्हा भाजप कार्यालयात डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ह्या प्रसंगी महानगर भाजप जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी , उत्तर महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडी सहसंयोजक डॉ . निलेश पाटील , महानगर वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.धर्मेंद्र पाटील , विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे , कार्यालय प्रमुख प्रकाश पंडित ह्यांची उपस्थिती होती.
डॉ . नरेंद्र ठाकूर हे एरंडोल परिक्षेत्रात सामाजिक , राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून ह्यापूर्वी त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडी ह्या पदावर कार्य केलेले आहे.
त्यांच्या ह्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व वैद्यकीय आघाडी प्रभारी आमदार गिरीशभाऊ महाजन ,
महाराष्ट्र जनजातीय क्षेत्र प्रमुख ऍड . किशोरजी काळकर , संघटनमंत्री रवीजी अनाजपूरें , खा. रक्षाताई खडसे , खा. उन्मेशदादा पाटील , आमदार चंदुलाल पटेल ,भाजप वैद्यकीय आघाडी राज्य संयोजक डॉ अजित गोपछडे , उत्तर महाराष्ट्र सयोंजक डॉ प्रशांत पाटील , एरंडोलचे नगराध्यक्ष रमेशजी परदेशी ,लोकसभा विस्तारक सचिन पानपाटील , तालुका भाजप अध्यक्ष मच्छिन्द्र पाटील व तालुका सरचिटणीस अमोल जाधव ह्यांनी अभिनंदन केले.