शिरूर (प्रशांत पवार): पुणे-नगर रस्त्यावर अपघातात मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलाच्या शिरूर शहरातुन जाणाऱ्या पुणे- नगर रस्त्यावर इंदिरा गांधी पुतळ्या जवळ अपघात झाला, त्याबद्दल शिरूर -हवेलीचे आ.सार्वजनीक उपक्रम समिती अध्यक्ष अशोक बापु पवार यांनी नगरपालिका अधिकारी व पोलिस अधिकारी बोलावून सुचना दिल्या असून वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर या मुला बरोबरच वर्षभरात दोघांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप शिरूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी केला आहे.
शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर काल(२) इंदिरा गांधी पुतळ्याजवळ टँकरच्या चाकाखाली आल्याने नऊ वर्ष वयाच्या आयुष दादाभाऊ जाधव या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. आयुष हा आपल्या वडिलांसमवेत शालेय साहित्य आणण्यासाठी येथे आला होता.
इंदिरा गांधी पुतळ्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारची धडक बसली यात दुचाकीवर मागील बाजूला बसलेला आयुष्य खाली पडला.यादरम्यान मागून येणाऱ्या दुधाच्या टँकरच्या चाकाखाली सापडल्याने आयुष गंभीर जखमी झाला.त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वर्षभरापूर्वी इंदिरा गांधी पुतळ्याजवळच एका टँकरच्या चाकाखाली सापडून एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले होते. या दोन्हीही घटनांवेळी वाहतूक पोलीस या रस्त्यावर हजर नव्हता.
त्यामुळे शिरूर हवेली चे आमदार अशोक बापु पवार यांनी पोलीस व नगरपालिका अधिकाऱ्यांना सक्त सुचना व खडसावले आहे.शिरूर हे विदर्भ मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर दररोज साधारण अडीचशे एसटी बसेसची वाहतूक होत असते. तसेच शिरूर हे श्रीगोंदा पारनेर अशा तीन तालुक्यांची बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर कायमच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे. पोलिसांनी जड वाहनांना या रस्त्यावर वाहतूक करण्यास प्रतिबंध करावा.नगरपालिका अधिकारी व पोलिस अधिकारी यांना वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करावे.भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊ नये,म्हणुन योग्य ते नियोजन व खबरदारी घ्यावी अशा सुचना दिल्या आहे.