बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील गतीमंद तरूणीवर गावातीलच तरूणाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय तरूणी ही गतीमंद असून ती आईवडीलांसोबत राहते. गतीमंद वेडसर पणा करत असल्याने तिच्या वडीलांनी तिला घराच्या बाहेर ओट्यावरील खाटेला दोरीने बांधले होते. २६ डिसेंबर रोजी दुपारी घरात कोणीही नसतांना गावातील संशयित आरोपी राजू सुकदेव वाघ याने वेडसरपणाचा गैर फायदा घेवून तरूणीवर बलात्कार केला. हा प्रकार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पिडीत तरूणीच्या आईवडीलांना समजला.
त्यांना बोदवड पोलीसात धाव घेवून हकीकत सांगितली. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजू वाघ यांच्या विरोधात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहे.